चार शाळांमधील अडीचशे मूल दृष्टिहीन होण्याची भीती मुले टीव्ही जवळून बघतायेत, दृष्टिदोषाची शक्यता : वेळीच डोळे तपासणीचा डॉक्टरांचा सल्ला
जळगाव : ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना मोबाइल, लॅपटॉपचा छंद
लागला आहे. मात्र, यामुळे अनेक मुलांना डोळ्यांच्या समस्या उद्भवत असून, लहान वयातच मोठ्या भिंगाचे चष्मे लागले असल्याचे दिसून येत आहे. शहरातील चार शाळांमधील १७४० मुलांची तपासणी शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातर्फे करण्यात आली. यात १५ टक्के (२६०च्या आसपास) मुले दृष्टिहीन होण्याच्या मार्गावर असल्याचे आढळून आले असून, त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याचा सल्लाही पालकांना दिला आहे.
जीएमसीच्या नेत्ररोग विभागातर्फे दर महिन्याला शाळांमध्ये जाऊन तपासणी केली जाते. त्यात ही बाब निदर्शनास आली आहे. प्रत्येक शाळेत जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांची तपासणी करणे शक्य नसल्याने शाळेच्या शिक्षकांना डोळ्यांची तपासणी कशी करावी, याचे साध्या सोप्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पूर्वी चष्मा केवळ वयस्क किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांवर पाहायला मिळायचा. परंतु, आता लहान-लहान मुलांनादेखील भिंगाचा
शिक्षकांना डोळे
तपासण्याचे प्रशिक्षण
प्रत्येक शाळेत जाऊन मुलांचे डोळे तपासणे नेत्ररोग तज्ज्ञांना शक्य नाही. त्यामुळे शाळेच्या शिक्षकांना डोळ्याची तपासणी कशी करावी याचे साध्या सोप्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्या शाळेत विद्याथ्यर्थ्यांचे डोळे तपासणी करण्याचे प्रशिक्षण घ्यायचे असेल, त्या शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही नेत्ररोग तज्ज्ञांनी सांगितले.
दृष्टी दोषांची लक्षणे
■ मुले घरात जवळून टीव्ही बघत असतील, मोबाइल अतिजवळ धरून बघत असतील किवा तिरळेपणा असेल, शाळेत फळ्यावरील अक्षर दिसत नसेल, वाचन करताना अक्षरांवरून बोट फिरवत असेल किंवा दूर बघताना डोळे बारीक करून बघत असेल, तर वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपल्या पाल्याची दृष्टी तपासून घ्या. आई किंवा वडिलांना चष्याचा नंबर असल्यास मुलांमध्ये देखील दृष्टीदोष असू शकतो किंवा मोठ्या मुलाला चष्मा असल्यास घरातील लहान भावंडांची दृष्टी देखील तपासून घ्या.
चष्मा लागल्याचे दिसून येते. मुले सतत टीव्ही, व्हिडीओ गेम, लॅपटॉप यांचा वापर करताना दिसतात. लहान मुले रडले किंवा कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केला, तर आई-वडिलांकडून
पालकांनो, मुलाची दृष्टी तपासून घ्या
दोन वर्षाच्या लॉकडाऊन दरम्यान ऑनलाइन शिक्षण पद्धती, मुलांकडून मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टीव्हीचा अभ्यासाव्यतिरिक्तही अतिवापर मुलांच्या दृष्टीदोषासाठी कारणीभूत ठरत आहे. मैदानी खेळांचा अभाव, सतत मोबाइलचा अतिवापर लहान मुलांमधील दृष्टीदोषासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यातही दुर्दैवाने काही मुलांच्या दृष्टीदोषाचे वेळीच निदान झाले नाही तर कायमचा दृष्टीदोष राहू शकतो.
प्रत्येक शाळेत १५ ते १७ टक्के विद्यार्थ्यांची नजर कमकुवत
■ गेल्या काही वर्षांत लहान वयात डोळ्याची नजर कमकुवत झाल्यास पुढे उतार वयात दृष्टीहीन होण्याची वेळ येते. त्यामुळे वेळीच डोळे तपासणी करून घ्यावीत. तसेच प्रत्येक शाळेत १५ ते १७ टक्के विद्यार्थ्यांची दृष्टी अतिशय कमी असल्याचे आढळून आले आहे.
बाळ रडतय, घरकाम करू देत नाही, म्हणून लहान बाळाच्या हाती मोबाइल देऊ नका, ही सवय पुढे दृष्टीसाठी घातक ठरू शकते. दृष्टी दोषामुळे येणारे अंधत्व हे पूर्णपणे वेळीच निदान आणि उपचार केल्यास आपण टाळू शकतो. मोतीबिंदू हे भारतात अंधत्वाचे प्रमुख कारण आहे. त्यानंतर दुर्लक्षित दृष्टीदोष हे कारण डोकेवर काढत आहेत. यासाठी शिक्षकांनी पालकांना मुलांच्या दृष्टीदोषाविषयी सांगितल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
- डॉ. धर्मेंद्र पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ जीएमसी,
त्याच्या हातात मोबाइल दिला जातो किंवा टीव्हीवर कार्टून लावून दिले जाते. त्यामुळे डोळ्यांवर ताण येऊन अनेक वेळा लहान मुलांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात. तसेच ज्यावेळी
मुले टीव्ही किंवा इतर साधने जवळून पाहतात त्यावेळी समजायचे की, मुलाची नजर कमकुवत झाली आहे. अशावेळी डॉक्टरांना दाखवून उपचार करून घ्यावा अन्यथा कमी वयात दृष्टी
जाण्याची भीती असते. त्यामुळे पालकांनी विशिष्ट वेळीच मुलांच्या हातात मोबाइल, लॅपटॉप वापरू द्यावा, टीव्ही पाहण्याची वेळही ठरवून द्यावी, असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.
0 टिप्पणियाँ